‘बेरीज वजाबाकी’ च्या ‘आकाश हे...’ गाण्याची टीनेजर्सना भुरळ

    21-Nov-2019
Total Views |


सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या कधीही न संपणाऱ्या स्पर्धेची सुरुवात लहान मुलांच्या शालेय जीवनापासूनच सुरु होत असते. या निरागस मुलांना निसर्गाच्या सानिध्यात फारसे येऊ दिले जात नाही मात्र लहान मुले निसर्गाशी किती मनमोकळा संवाद साधतात, मनसोक्त बागडतात हे दाखवणारे आकाश हे...या सुंदर गीताने टीनेजर्सना भुरळ घातली आहे. जंपिंग टोमॅटो मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत इन असोसिएशन विथ पीएमआरवाय प्रोडक्शन्स निर्मित बेरीज वजाबाकीया आगामी मराठी चित्रपटातील हे गाणे आहे. राजू भोसले निर्मित, दिग्दर्शित या चित्रपटाला अभिजित नार्वेकर यांनी संगीत दिले आहे, तर अंबरीश देशपांडे यांची गीते आहेत. आकाश हे...या गीताला राशी हरमलकर, विश्वजा जाधव, मानस भागवत यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वरबद्ध केले आहे.

टीनेजर्सचे भावविश्व वेगळ्या पद्धतीने उलगडणाऱ्या बेरीज वजाबाकीची कथा आणि संवाद प्रताप देशमुख यांचे आहेत तर पटकथा राजू भोसले, प्रताप देशमुख यांची आहे. बेरीज वजाबाकीचे निर्माते राजू भोसले असून रोहनदीप सिंग, विशाल हनुमंते, दत्तात्रय बाठे, प्रदीप मठपती हे सहनिर्माते आहेत.

आजच्या पालक आणि मुलांमधील नाते अतिशय हटके अंदाजात उलगडणाऱ्या या चित्रपटात मोहन जोशी, नंदू माधव, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, गिरीश परदेशी, मिलिंद गवळी, स्मिता शेवाळे, रमेश परदेशी, डॉ. प्रचीती सुरु, गायत्री देशमुख, सारिका देशमुख, अमित वझे, नीता दोंदे, जयेश संघवी, भक्ती चव्हाण आदी कलाकार असून नील बक्षी. जाई रहाळकर, अमेय परदेशी, आदिश्री देशमुख, यश भालेराव, आर्या काकडे, शर्व कुलकर्णी, तन्वी सावरगावकर, रामदास अंधारे, सोहम महाजन, ओंकार जाधव आणि विशेष भूमिकेत स्वराज्यरक्षक संभाजीमालिका फेम ओम चांदणे या बालकलाकारांनी धमाल उडवून दिली आहे.

चित्रपटाच्या टीजर मधून निर्माण झालेली उत्सुकता या गाण्याने अधिक वाढली आहे. बेरीज वजाबाकीहा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.