नुसताच राडा अन् धुराळा!

    दिनांक  20-Nov-2019 19:03:37
|हव्वा कुनाची रं? ... हव्वा आपलीच रं, राडा, धुराळा! असं म्हणत दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या 'धुरळा' चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. अलका कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी नावाजलेली कलाकार मंडळी या टीझरमध्ये दिसली. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले आहेत. त्यामुळे आता चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. ३ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'धुरळा' चित्रपट आणि #पुन्हानिवडणूक वाद...

ट्विटरवर काही मराठी कलाकारांनी सुरू केलेल्या #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. या हॅटशॅगविषयी बोलताना दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले की, '#पुन्हानिवडणूक? हा चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे, त्याचा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे काही कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या हॅशटॅगचा वापर केलेला.'