साखरेचे अतिसेवन म्हणजे विष !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |



मुंबई : दारू आणि सिगारेटप्रमाणे आता साखरेच्या उत्पादनांवरदेखील दिला जाणार वैधानिक इशारा. यापूर्वीदेखील अनेक संशोधनातून साखरेला पांढरे विष असे संबोधण्यात आले आहे. आता केंद्रीय मंत्रालयानेदेखील ही बाब गांभीर्याने घेतली आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "साखरेचे अतिसेवन करणे हे शरीरासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आता साखरेच्या पॅकिंगवरदेखील दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील वेस्टनाप्रमाणेच ‘साखरेचे अतिरिक्‍त सेवन धोकादायक’ असा वैधानिक इशारा छापण्याचे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे."

 

भारतामध्ये साखर, मीठ आणि मैदा यांचे सेवन अधिक होत आहे. मधुमेह, उच्च रक्‍तदाब आणि स्थूलपणा निर्माण करण्यात या गोष्टींचा हातभार लागतो. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात. देशात प्रतिवर्षी मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्वयंसेवी संस्थेमार्फत 'राईट टू इट मिशन' राबवले. केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाने आता ही चळवळ सरकारी बनवली आहे. या चळवळीअंतर्गत साखर पॅकिंगवर वैधानिक इशारा लिहिणे बंधनकारक केले जाणार आहे.

 

भारतीय अन्न व औषध मानदे प्राधिकरण संस्थेने (एफएसएसए) या संदर्भात शिफारसी केल्या आहेत. या संदर्भात अंमलबजावणी झाल्यास, साखर उद्योगाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. एकंदरीत गेली अनेक महिने साखर विक्री मंदावली आहे. तीन तीन महिने एकही ग्राम साखर विक्री होत नाही, तसेच साखरेची मागणी घडल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका साखर उद्योगाला बसत आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

@@AUTHORINFO_V1@@