छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने संबोधलं तर...

    दिनांक  20-Nov-2019 14:20:57
|


ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाच्या एका पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल होत आहे. शरद केळकर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराने प्रश्न विचारतेवेळी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. आणि त्यावर उत्तर देण्याआधी प्रसंगावधान राखून शरदने त्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज' असे म्हणत त्यांची चूक दुरुस्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा अनादर हा आपल्या सुवर्णाक्षरात कोरलेल्या महारांच्या इतिहासाचा अवमान केल्यासारखेच वाटते. आणि त्याला अशी प्रतिक्रिया मिळणे हे साहजिकच आहे.

दरम्यान 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर चर्चांना अक्षरशः उधाण आले. ट्रेलरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि भरभरून कौतुक देखील केले. या चित्रपटातील शरद केळकर या चित्रपटात साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे पोस्टर देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.