सदा कर्तव्यदक्ष मुंबई पोलिस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |



मुंबई : कर्तव्य दक्ष मुंबई पोलिसांची कामगिरी सातासमुद्रापल्याड पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या अॅडम जॅक्शनचे हरवलेले १० लाखाचे सामान मुंबई पोलिसांनी शोधून पुन्हा त्याच्याकडे सुपूर्त केले आहे. यामुळे मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑस्ट्रेलियन नागरिक असलेला अॅडम जॅक्शन पेशाने स्थापत्यविशारद असून, तो अबू धाबीमध्ये राहतो. कामानिमित्त मुंबईत आलेल्या अॅडमने रात्री १० वाजता गोरेगाव येथील हॉटेल फर्नमध्ये जाण्याकरता टॅक्सी पकडली. यावेळी अॅडम १० लाखाहून अधिक रकमेचे आपले सामान टॅक्सीतच विसरला. या सामानात लॅपटॉप, कॅमेरा, लेन्स आणि घड्याळ होते. सामान टॅक्सीतच विसरल्याचे लक्षात येताच त्याने हा सगळा प्रकार हॉटेलच्या मॅनेजरला सांगितला. त्याने याबाबत कायेदशीर तक्रार करण्याचा सल्ला अॅडमला दिला.

हॉटेल मॅनेजरच्या सल्ल्यानुसर दुसऱ्या दिवशी अॅडमने वनराई पोलीस ठाण्यात याबाबत कायदेशीर तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून टॅक्सीचा नंबर, त्यानंतर टॅक्सी चालकाचं नाव आणि पत्ता शोधून काढला आणि संपूर्ण सामान अॅडम यांच्या हवाली केले.

ज्या सामानाची अपेक्षाच आपण सोडली होती ते सामान सापडल्यामुळे अॅडमला प्रचंड आनंद झाला. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेची कीर्ती पुन्हा एकदा सातासमुद्रापार गेली आहे.

@@AUTHORINFO_V1@@