ई चलन भरा अन्यथा तुरुंगात जा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |


मुंबई : वाहनांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी १० दिवसात दंड न भरल्यास त्यांच्या अटकेची कारवाई होऊ शकते. ई चलन प्रणालीअंतर्गत वाहन आणि वाहनांची कागदपत्र किंवा परवानासुद्धा जप्त केला जात नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून चालक ई चलन थकवतात. तरीही, ई चलन भरण्यासाठी आणखी १० दिवसांची म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तोपर्यंत चलन न भरल्यास अटकेची कारवाई होऊ शकते.

 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये ई-चलन प्रणाली सुरू केली. वेगमर्यादा तपासणारे कॅमेरे बसविण्यात आले. त्याचप्रमाणे पावती पुस्तकाऐवजी पोलिसांच्या हाती मशिन देण्यात आल्या. या मशिनवर गाडीचा फोटो तसेच गाडी क्रमांक, परवाना क्रमांक आणि इतर माहिती टाकल्यावर ई-चलन तयार होते. गेल्या अडीच वर्षात सुमारे ५५ लाख ई-चलन जारी करण्यात आले असून यावरील सुमारे शंभर कोटींचा दंड वसुलीविना पडून आहे. स्वतःहून दंड भरण्यासाठी येणाऱ्या चालकांची संख्या फारच नगण्य असून पोलिस वसुलीसाठी गेल्यास टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@