महा MTB परिवारातील पत्रकार प्रथमेश नारविलकर यांचे निधन

    दिनांक  20-Nov-2019 12:13:34
|


पुणे
: पुण्यातील पत्रकार प्रथमेश नारविलकर (वय - ३३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री ९:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे आई
, वडिल, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

पुण्यातील मिडिया विद्या या कंपनीमध्ये बँकिंग आणि कन्टेन्ट या विषयांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्याबरोबर महा MTB या वेब पोर्टलसाठी त्यांनी लेखन, मुव्ही रिह्यू तसेच अनेक सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम व्यक्तींच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. पत्रकारितेमध्ये वेगवेगळे विषय हाताळण्याची आणि त्यामध्ये प्रयोग करण्याची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्ट यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.

महा MTB आणि मुंबई तरुण भारत परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.