आधारकेंद्रे आता संपूर्ण आठवडाभर

    दिनांक  20-Nov-2019 21:42:17
|नवी दिल्ली : नागरिकांची दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेत 'युआयडीएआय'ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या आधी ही केंद्रे मंगळवारी बंद असायची. 'युआयडीएआय'ने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. दररोज एक हजार आधार एन्रोलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे.