'स्वदेशी पीएम मोदी' : बँकॉकमध्ये घुमणार 'मोदी'घोष

    दिनांक  02-Nov-2019 15:58:30
|

बँकॉक
: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौर्‍यावर आहेत. ते आपल्या दौर्‍यादरम्यान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) शिखर परिषदेत सहभागी होतील.


आज बँकॉकमध्ये थायलंड दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी नॅशनल इंडोर स्टेडियममध्ये
'स्वदेशी पीएम मोदी' नावाच्या कार्यक्रमात थायलंडमधील भारतीयांना संबोधित करतील. थायलंडमध्ये भारतीय समुदायाची संख्या सुमारे अडीच लाख इतकी आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान श्री गुरुनानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्ताने स्मृती विशेष नाणं जारी करतील.दुसर्‍या दिवसाचा कार्यक्रम

या दौऱ्यादरम्यान 3 नोव्हेंबरला थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-च यांच्यासमवेत पंतप्रधान मोदी 16 व्या भारत-आसियान शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. थायलंडच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणाने पंतप्रधान मोदी या परिषदेस गेले आहेत. थायलंडमधील भारतीय राजदूत सुचित्रा दुराई म्हणाल्या, "आसियानशी संबंधित समिट भारतीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेआरसीईपीमधील सदस्य राष्ट्रे कोणती
?

रीजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) ब्लॉकमध्ये आशियाई समूहाचे १० सदस्य राष्ट्र (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलिपीन्स, लाओस आणि व्हिएतनाम) आणि त्यांचे सहा एफटीए भागीदार आहेत - ज्यात भारत, चीन, जपान , दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे