संघ स्वयंसेवकाने मुस्लीम शाळेतील मुलींसाठी बांधले शौचालय

    19-Nov-2019
Total Views |



रायगड : रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा व हाजी ताहिर उर्दू हायस्कूल या शाळेत शौचालय नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व ‘नाना पालकर स्मृती समिती’चे व्यवस्थापक कृष्णा महाडिक यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबईमधील उद्योगपती सुमनताई रमेश तुलसियानी यांची भेट घेतली.


सुमनताईंनी तत्परतेने त्यांच्या संस्थेमधून देणगी देऊन नवीन शौचालय उभारले
. या शौचालयाचे उद्घाटन सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता झाले. उद्घाटनाच्या वेळेस कृष्णा महडिक, तला तालुक्याचेतहसीलदार शेट्टी, दाऊदखान पठाण, चिराग खाचे, जावेद कागदी, रजाक लोखंडे, इमरान खान, इर्षद खाचे, इरफान खान व संजय रिकामे उपस्थित होते.