वर्षात राज्यभर सुपर ३० केंद्रे स्थापन करणार : गणितज्ञ आनंद कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |



नागपूर : "येत्या वर्षाभारत 'सुपर-३०'च्या धर्तीवर राज्यातही केंद्रे स्थापन करणार." अशी माहिती सुप्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना दिली. 'आज शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आराखडा आखण्यात येत आहे' असेही आनंदकुमार पुढे म्हणाले.

 

वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर बोलताना, श्रीमंत विद्यार्थ्यांकडून जरूर शुल्क आकारण्यात यावे. मात्र गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली पाहिजे, असे ते म्हणाले. विद्यापीठीय स्तरावर राजकारण करायला हरकत नाही. पण त्याचा स्तर खालावता कामा नये, असेही मत त्यांनी मांडले. डॉक्टर झाल्यानंतर तीन वर्षे ग्रामीण भागात काम करण्याचा करार लिहून घेतल्या जातो. त्याचप्रमाणे आय. आय. टी. झालेल्यांकडून लिहून घ्यायला पाहिजे. त्याचा फायदा देशाला होऊ शकतो, असे आनंदकुमार म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@