हा अभिनेता साकारणार पुलेला गोपीचंद

    दिनांक  19-Nov-2019 17:01:24
|सायना नेहवाल हिच्या बायोपिकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोठ्या पडद्यावर पुलेला गोपीचंद यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मानव कौलची वर्णी लागली आहे.

मानवने त्याच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सायना नेहवालच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतील माझा फर्स्ट लुक...' असे म्हणत त्याने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. 

सायना नेहवाच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहेत. सप्टेंबर २०१८मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला श्रद्धा कपूरसोबत सुरुवात झाली होती. मात्र चित्रीकरण सुरू होताच श्रद्धाला डेंग्यू झाल्यामुळे तिने काही काळ ब्रेक घेतला होता. एप्रिलमध्ये पुन्हा सायनाच्या चित्रपटाचे काम सुरू होणार होते मात्र तिने आधीच दुसऱ्या चित्रपटांसाठी तारखा दिल्या असल्यामुळे तिला चित्रपट सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली.