राज्यसभा मार्शलांचा नवीन पोशाख बघून सगळे अवाक

19 Nov 2019 15:05:51


संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र एका विशेष गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे राज्यसभेतील मार्शल यांचा बदलेला पोशाख. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्याबरोबर सदनात येणाऱ्या राज्यसभेच्या मार्शल यांच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काल सदनाचे कामकाज सुरु झाल्यावर मार्शल यांचा ड्रेस पाहून सगळेच चकित झाले.

राज्यसभेचे हे २५० वे सत्र असल्यामुळे एक विशेष पेहराव त्यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा नवीन पोशाख सेनेच्या गणवेशाशी मिळता-जुळता असल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र हा निर्णय राज्यसभेतील बाकी कर्मचाऱ्यांपासून वेगळा असावा यासाठी देखील घेण्यात आला असल्याची शक्यता आहे.

दरम्यान आत्तापर्यंत या गणवेशावरून बऱ्याच चर्चा देखील झाल्या आहेत. गणवेशातील हा बदल करण्याचा निर्णय एका वर्षांपूर्वीच घेतल्याचे सांगण्यात येत असून यावर्षी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0