अपूर्वा म्हणतेय, चर्चेत असल्याचा आनंदच !

19 Nov 2019 17:44:11



झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले २ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेतील 'शेवंता' या पात्राची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. सोशल मीडियाच्या युगात आजकाल एखादी गोष्ट अगदी काही सेकंदातच लोकांपर्यंत पोचते. तसेच हे माध्यम सुलभ असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया देखील या माध्यमावर लगेचच उमटतात. तसंच सध्या प्रत्येक नव्या गोष्टीवर मिम्स देखील वायरल होताना आपण पाहत आहोत. अण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखांवरदेखील असंख्य मिम्स बनतात.




याबद्दल मालिकेविषयी बोलताना अपूर्वा म्हणाली
, "सुरुवातीला मला खूप हसू यायचं, की मिम्स बनवायला कुणाकडे एवढा वेळ आहे. शेवंताला येऊन नऊ-दहा महिने झाले आहेत. पण, प्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला नाही याचा मला खूप आनंद होतो. सगळ्या वयोगटांमध्ये आज शेवंता आणि अण्णांची चर्चा आहे. याचं सगळं श्रेय मी आमचे दिग्दर्शक आणि कॅमेरामनला देईन."

Powered By Sangraha 9.0