'गुड न्यूज'- ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक  18-Nov-2019 15:45:01
|


अक्षय कुमार, करीना कपूर खान. दिलजीत डोसांज आणि किआरा अडवाणी या सगळ्या आघाडीच्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांसमोर आला. बत्रा VS बत्रा म्हणजेच दीप्ती आणि वरुण बत्रा यांच्या विरुद्ध हनी आणि मोनिका बत्रा या दोन्ही दाम्पत्यांमधील चढा-ओढ ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. आणि ही चढाओढ नेमकी कशासाठी आहे याचे उत्तर तुम्हाला ट्रेलर पाहिल्यावरच कळेल.

चित्रपटाची साधारण कथा तुम्हाला या ट्रेलरमधून लक्षात येईल मात्र त्यातील विनोद आणि काही छोटे मोठे ट्विस्ट पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. त्यामुळे 'गुड न्यूज' या चित्रपटातील गुड न्यूज नक्की काय आहे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल मात्र ती न्यूज मिळाल्याचा आनंद संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर नक्की द्विगुणित होईल. चित्रपटातील संवाद ज्योती कपूर, रिषभ शर्मा आणि राज मेहता यांनी लिहिले आहेत.

येत्या २७ डिसेम्बरला ही गुड न्यूज नेमकी काय हे प्रेक्षकांना जाणून घेता येईल. राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' या चित्रपटाला हिरु जोहर, करण जोहर, शशांक खैतान, अपूर्व मेहता आणि अरुण भाटिया यांचे निर्मिती साहाय्य मिळाले आहे.