...या कारणांसाठी यावर्षीचा इफ्फी महोत्सव ठरेल विशेष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |


जगभरातून नावाजल्या गेलेल्या ५० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी महोत्सवाला आता फक्त दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे उपस्थित राहणाऱ्या इच्छुक चित्रपट प्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे इफ्फीच्या इतिहासात या पूर्वी कधीच न घडलेल्या काही गोष्टी यावर्षीच्या या गोल्डन जुबली महोत्सवाची आकर्षणे ठरणार आहेत. काय आहेत या गोष्टी...

१. इफ्फी २०१९ मध्ये आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त फिल्म प्रीमियर होणार आहेत. ९० भारतीय चित्रपट, ६ जागतिक चित्रपट आणि ११ आशियाई चित्रपटांचे प्रीमिअर या महोत्सवात करण्यात येणार आहेत.

२. इफ्फी २०१९ च्या शुभारंभाच्या दिवशी, भारत सरकारच्या वतीने पहिल्यांदाच 'Icon of Golden Jubilee of IFFI' हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता रजनीकांत यांना देण्यात येणार आहे.

३. यावर्षी इफ्फीमध्ये जवळपास ३५ मास्टरक्लास, संवाद आणि चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 'चित्रपट निर्मितीतील बारकावे' या विषयावर भर देण्यात येईल.

४. इफ्फीमध्ये यापूर्वी कधीही नसलेले ८ विभाग असतील. ज्यामध्ये महत्वाचे दोन विभाग असतील यापूर्वी 'गोल्डन पीकॉक रेट्रोस्पेक्टिव्ह' विभाग ज्यामध्ये गोल्डन पिकॉक पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा समावेश असेल तर गोल्डन लाइनिंग सेक्शन या दुसऱ्या विभागात ५० वर्षपूर्ती होणाऱ्या चित्रपटांचा समावेश असेल.

५. महोत्सवात ३ मूकपट दाखवण्यात येतील ज्यांना जॉनी बेस्ट यांच्या पियानोची साथ असेल.

६. महोत्सवाला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना, मुंबईतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेले १७ माहितीपट आणि लघु कथा पाहण्याची संधी मिळेल.

७. 'द गोवन स्टोरी' या विभागाअंतर्गत पहिल्यांदाच गोव्याची प्रादेशिक भाषा असलेल्या कोकणी भाषेतील चित्रपटांना यावेळी पुरस्कृत करण्यात येईल.

८. चित्रपट सृष्टीतील बहुमूल्य योगदानाबद्दल १६ व्यक्तिमत्त्वांचा या महोत्सवादरम्यान सन्मान करण्यात येईल.

९. चित्रपट सृष्टीतील स्त्रियांच्या योगदानाचा विशेष सन्मान करत ५० महिला चित्रपट निर्मात्यांचे ५० चित्रपट हा यावर्षीच्या महोत्सवातील एक विभाग आहे.

१०. यावर्षी पहिल्यांदाच गोव्यातील जॉगर्स पार्क आणि मिरामार बीच येथे खुल्या पटांगणात चित्रपटांची स्क्रीनिंग करण्यात येणार आहेत.

११. चित्रपटांमधील बदलत्या तांत्रिक विकासांना अनुसरून यावर्षीच्या महोत्सवात चित्रपटांच्या व्ही.आर. टेक्निक विषयी देखील एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

१२. ५० व्या इफ्फी महोत्सवाचे प्रतीक म्हणून यावर्षी एक टपाल तिकिटाचे देखील अनावरण करण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@