हा अभिनेता ‘भूत’ बनून प्रेक्षकांना घाबरवणार

    दिनांक  16-Nov-2019 12:54:04
|येत्या वर्षात अभिनेता विकी कौशल एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भूत : द हॉन्टेड शीप’ या चित्रपटाचा फर्स्टलूक करण जोहरने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवरून पोस्ट केला. या पोस्टरमध्ये विकी कौशल एका नवीन अवतारात दिसत आहे.


भूत : द हॉन्टेड शीप’ या चित्रपटाची कथा मुंबईमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातून विकी कौशल प्रथमच एका हॉररपटात काम करणार आहे. भानु प्रताप सिंग दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात विकी कौशलसह भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


आयुष्मान खुरानाचा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ आणि विकी कौशलचा
भूत : द हॉन्टेड शीप’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने यात कोणाची सरशी ठरणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.