हिंदी चित्रपटसृष्टी गाजवतोय हा मराठी अभिनेता !

    दिनांक  16-Nov-2019 17:11:40
|


‘हंटर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘मणिकर्णिका’ यांसारख्या चित्रपटांतून हिंदी चित्रपटसृष्टीत झळकलेला मराठी चेहरा म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी. वैभव लवकरच एका नवीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मिडीयावर सक्रीय असणाऱ्या वैभवने इन्स्टाग्रामच्या माध्यामतून आपल्या चाहत्यांसोबत ही खास बातमी शेअर केली.


वैभव लवकरच ‘त्रिभंगा’ या चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘त्रिभंगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे करणार असून, या चित्रपटात वैभवला काजोलसह काम करण्याची संधी मिळाली आहे. तुमच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी समृध्द करणारा अनुभव आहे,’ असं म्हणत वैभवने काजोलसोबतचा फोटो शेअर केला.


‘त्रिभंगा’ चित्रपटाची कथा मुंबईतल्या एका कुटुंबाभोवती फिरते. १९८०च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची ही कथा, त्यांच्या जीवाशैलीशी निगडीत समस्यांवर भाष्य करणारी आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त वैभव लवकरच प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतलादेवींच्या बयोपिकमध्ये विद्या बालनसोबत झळकणार आहे.