‘सायना’च्या सेटवर परिणीती जखमी

    दिनांक  16-Nov-2019 13:34:39
|

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा
खास मेहनत घेत आहे. ही भूमिका अगदी हुबेहूब वठवता यावीसाठी ती पुरेपूर प्रयत्न करतेय. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान परिणीती जखमी झाली असून तिच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे.  

मी आणि 'सायना' चित्रपटाची पूर्ण टीम माझी खूप काळजी घेते. मला कुठे दुखापत होऊ नये, याकडे त्याचे खास लक्ष असते. पण, तरीही दुखापत झालीच. बॅटमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी शक्य तितका अधिक वेळ आराम करणार आहे,' से परिणीतीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

'सायना' चित्रपटासाठी परिणीती तज्ञांकडून बॅटमिंटनचे धडे गिरवतेय. भूमिकेच्या तयारीसाठी परिणीतीने काही दिवसांपूर्वी चक्क सायना नेहवालच्या घरी मुक्काम ठोकला होता. सायनाच्या घरी राहून तिने भूमिकेचा बारीकीने अभ्यास केला.

परिणीतीच्या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात झळकणार होती. मात्र, तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आणि तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली.