पुन्हा एकदा सफर ‘मिर्ज़ापुर’ची!

    दिनांक  16-Nov-2019 16:01:38
|
उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी आणि राजकारण यांचा एकमेकांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांवर आधारित ‘मिर्ज़ापुर’ ही वेबसीरीज २०१८ मध्ये प्रदर्शित झाली होती. गुड्डू, बबलु हे दोन भाऊ, अखंडानंद त्रिपाठी आणि त्याचा मुलगा मुन्ना या पात्रांभोवती फिरणाऱ्या या कथेने थोड्या कालावधीतच लोकप्रियता मिळवली. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाशी या वेबसीरीजची तुलना करण्यात आली होती. या सीरीजच्या पुढच्या पार्टमध्ये काय होणार? दुसरा सीजन नेमका कधी येणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.मिर्ज़ापुर’च्या वर्षपूर्ती निमित्ताने आज या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. या सिरीजच्या टीझरसह अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी आज इन्स्टाग्रामच्या विश्वात पदार्पण केलं. हम बनाएँगे instagram को मिर्ज़ापुर,’ असं म्हणत त्यांनी हा टीझर प्रदर्शित केला. येत्या नवीन वर्षात या वेबसीरीजचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून, नेमकी तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे.