भारतीय नौसेनेच्या मिग २९ K गोव्यात दुर्घटग्रस्त, पायलट सुरक्षित

16 Nov 2019 14:17:19


 

भारतीय नौसेनेचे मिग २९हे विमान टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झाले आहे. दिलासाजनक गोष्ट म्हणजे विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असून त्यांनी विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. हे दोन्ही पायलट प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगण्यात येते. ज्या विमानाला अपघात झाला ते प्रक्षिक्षणासाठीचे लढाऊ विमान असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय नौसेनेचे कमांडर विवेक माधवाल यांनी याविषयी माहिती देताना, दुर्घटनाग्रस्त झालेल्या मिग २९ K प्रशिक्षक लढाऊ विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले. पायलट कॅप्टन एम.शियोखंड आणि लेफ्टिनेंट कमांडर दीपक यादव यामधून सुखरूप बाहेर पडल्याचे देखील त्यांनी सांगितले.

नौसेनेचे हे विमान गोव्याच्या सीमेदरम्यान उड्डाण घेत होते त्यादरम्यान एका पक्षाची विमानावर टक्कर लागल्यामुळे डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागली आणि विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

Powered By Sangraha 9.0