जब दुआ लिपा मेट एसआरके...

16 Nov 2019 17:47:29



इंग्लंडची पॉपस्टार दुआ लिपाचे आज भारतात आगमन झाले. मुंबईत होणाऱ्या ‘वनप्लस म्युझिक फेस्टिवल’ या म्युझिक कॉन्सर्टसाठी ती भारत दौऱ्यावर आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ती परफॉर्म करणार आहे.

दुआ लिपाने भारतात आल्यावर पहिली किंग खानची भेट घेतली. दुआ ऐअरपोर्टवरून थेट मन्नतवर जाऊन शाहरुख खानला भेटली. शाहरुख खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.


मुंबईमध्ये होणाऱ्या या म्युझिक कॉन्सर्टमध्ये दुआ लिपा, पॉपसिंगर केटी पेरीसह परफॉर्म करणार आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये भारतीय गायक आणि गीतकार अमित त्रिवेदीही परफॉर्म करताना दिसणार आहे.

Powered By Sangraha 9.0