कलाकार का म्हणतायत #पुन्हानिवडणूक?

    दिनांक  15-Nov-2019 17:43:00
|


 सध्या ट्विटरवर सुरू असलेल्या पुन्हा निवडणूक या हॅशटॅगवरून वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू असताना, कलाकारांकडून ‘#पुन्हानिवडणूक’ असं ट्विट करण्यात येत आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ‘#पुन्हानिवडणूक’ असं एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे.
या ट्विटमुळे मराठी कलाकारांना पुन्हा एकदा निवडणूक व्हावी अशी इच्छा असल्याचं म्हणत अनेकांनी कलाकारांवर टीकाही केली आहे. या ट्विटचा राजकारणाशी संबंध असल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला.

मात्र या ट्विटचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीच संबंध नसून, हे सर्व कलाकार झी स्टुडिओच्या आगामी ‘धुरळा’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित असल्याने, चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून पुन्हा निवडणूक हा हॅशटॅग वापरला जात आहे. समीर विद्धावंस दिग्दर्शित धुरळाहा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.