रेल्वेतल्या जेवणासाठी मोजावे लागणार जादा पैसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली :
लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने करणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागणार आहे. रेल्वेत मिळणाऱ्या चहा, नाश्ता आणि जेवणासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाने याबाबत परिपत्रक काढले असून, या परिपत्रकानुसार राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट काढतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसे द्यावे लागतात.

कसे असतील हे नवे दर

  • फर्स्टक्लास एसी दरपत्रक

 

जुने दर

नवे दर

सकाळचा चहा

१५

३५

नाश्ता

९०

१४०

जेवण

१४५

२४५

संध्याकाळचा चहा

७०

१४०


  • सेकंड आणि थर्ड टीअर एसी दरपत्रक

 

जुने दर

नवे दर

सकाळचा चहा

१०

२०

नाश्ता

७५

१०५

जेवण

१२५

१८५

संध्याकाळचा चहा

४५

९०


  • स्लीपर क्लास दरपत्रक

 

जुने दर

नवे दर

सकाळचा चहा

१०

१५

नाश्ता

४०

६५

जेवण

८०

१२०

संध्याकाळचा चहा

२०

५०


येत्या १५ दिवसांत हे दर रेल्वेच्या मेन्यूमध्ये अपडेट केले जाणार असून, ४ महिन्यांनी हे दर लागू होतील.

@@AUTHORINFO_V1@@