दीप-वीर पुन्हा एकदा चर्चेत!

    दिनांक  15-Nov-2019 18:33:35
|रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला काल १४ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ही जोडी तिरुपती बालाजीला पोहोचली. बालाजी दर्शनानतंर ही जोडी ते थेट पंजाब
'सुवर्ण मंदिर' येथे पोहोचली आहे. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचा पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले. यावेळी दीपिकानं लाल रंगाचा सलवार सूट परिधान केला होता तर रणवीर कुर्ता आणि नेहरू जॅकेटमध्ये दिसला.यावेळी रणवीर आणि दीपिकासोबत त्यांच्या कुटुंबातील मंडळीनींही हजेरी लावली होती.
'दीप-वीर'ची जोडी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी काय प्लॅन आखणार, परदेशात कुठे फिरायला जाणार याबाबत त्यांच्या फॅन्सना उत्सुकता होती. मात्र, या दोघांनीही लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा एकदम हटके मार्ग निवडला. लग्नाचा वाढदिवस पार्टी देऊन साजरा न करता या जोडीनं देवदर्शनासाठी हा दिवस राखून ठेवला.

 
तिरुपती बालाजीच्या दर्शनाने त्यांनी या सेलिब्रेशनची सुरुवात केली. त्यानंतर ते पद्मावती मंदिरातही गेले. या दोन्ही ठिकाणी दर्शन झाल्यानंतर त्यांनी थेट अमृतसर गाठत सुवर्णमंदिरात माथा टेकून आशीर्वाद घेतला.

 


दीपिका आणि रणवीरनं गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला इटलीत लग्नगाठ बांधली. १४ नोव्हेंबरला या दोघांनी पारंपरिक कोंकणी पद्धतीनं विवाह केला
, तर १५ नोव्हेंबरला ही जोडी सिंधी पद्धतीनं विवाहबद्ध झाली.