राहुल गांधी माफी मांगो !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |




भाजप करणार देशव्यापी आंदोलन




मुंबई : राफेल प्रकरणात कथित गैरव्यवहार झाल्याचे सांगत देशाच्या सुरक्षितता आणि संरक्षणाबद्दल आक्षेप घेत खोटा अपप्रचार केल्याबद्दल राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी करण्यासाठी भाजपतर्फे देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे.

 

'चौकीदार चोर है', असे वाक्य राफेल प्रकरणाचा निर्णय आल्यानंतर न्यायालयाच्या तोंडी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधींना माफी मागावी लागली होती. मात्र, संरक्षण मंत्रालयातर्फे झालेल्या राफेल करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत देशाच्या सुरक्षेबद्दल साशंकता व्यक्त केल्या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी आता भाजपतर्फे केली जाणार आहे.

 

महाराष्ट्र भाजपतर्फे घेण्यात आलेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली. शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी देशस्तरावर हे आंदोलन भाजपच्या कार्यकर्त्यांतर्फे केले जाणार असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली.




 

@@AUTHORINFO_V1@@