'भाजप'विना राज्यात सरकार अशक्य : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |


 


मुंबई
: राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच अव्वल असून राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होणे शक्य नाहीत, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

"ज्या पक्षाकडे ११९ आमदार आहेत, त्यांच्या सहभागाशिवाय राज्यात कुणाचेही सरकार बनू शकणार नाही. राज्यात येणारे सरकार भाजपचेच असेल," असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

देवेंद्र फडणवीस यांनीही काल भाजपशिवाय राज्यात कुणाचंही सरकार येणार नाही, असा दावा केला होता. त्यानंतर चंद्रकांतदादांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीतील माहिती दिली.

ते म्हणाले, "आमचीही राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर आहे. भाजपचे १०५ आमदार असून आम्हाला १४ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमच्याशिवाय कुणाचही सरकार बनू शकत नाही." देवेंद्र फडणवीस यांनीही आजच्या बैठकीत हेच स्पष्ट केल्याचे सांगताना, कुणाबरोबरही कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@