दुकानदारीतून यश आणि स्वप्नपूर्ती !

    दिनांक  15-Nov-2019 15:49:26
|
सध्या मोठ्या शहरांमध्ये भव्य
, आकर्षक, अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे शॉपिंग मॉल्स उभे राहत असले तरी गावांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्येच नव्हे तर मोठ्या शहरातल्या गल्लीबोळांमध्ये असलेले छोटे दुकानदार हा सर्वसामान्य ग्राहकांसाठी खरेदीचा खात्रीशीर आणि विश्वासाचा पर्याय आहे. कारण आर्थिक व्यवहारांपलीकडे या दुकानदारांचं ग्राहकांशी आपुलकीचं नातं असतं.

ग्राहकांसाठी असं विश्वासाचं नाव म्हणजे पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा
. लि. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या मनात पितांबरी कंपनीने एक विशेष स्थान मिळवले आहे. विविध उत्पादने आणि उत्तम दर्जाची गुणवत्ता यामुळेच पितांबरी घराघरांत पोहोचली आहे. भारताबाहेरही २६ होऊन अधिक देशांमध्ये या उत्पादनांची निर्यात होते.

 


उद्योग विस्तारासोबतच उद्यमशीलतेलाही पितांबरी नेहमीच प्रोत्साहन देते. याचाच एक भाग म्हणून पितांबरी घेऊन येत आहे 'पितांबरी शॉपी फ्रँचायसी योजना'. दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या जागेचा व्यापारी उपयोग करण्याची ही योजना आहे. यात सहभागी होणारा दुकानदार प्राथमिक स्वरूपात आणि सोप्या पद्धतीने पितांबरीच्या विक्रीवाढीचा साहाय्यकच होणार आहे.आज पितांबरीची १२५ वेगवेगळ्या पॅकिंगमधली
५५ होऊन अधिक अभिनव उत्पादनं ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पितांबरी या उत्पादनांची जाहिरात करत असते आणि या उत्पादनांना ग्राहकांकडून मागणीदेखील असते. परंतु ही उत्पादने वेगवेगळ्या डिव्हिजन्स मधील असल्याने एकाच दुकानात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पितांबरीची सर्व उत्पादने एकाच जागी हमखास मिळणारं दुकान असावं अशी ग्राहकांची मागणी आहे.


त्यामुळे 'पितांबरी शॉपी फ्रँचायसी योजनेत सहभागी होणाऱ्या दुकानदारांना त्यांच्या दुकानातील अन्य (पितांबरीची स्पर्धक उत्पादने सोडून) उत्पादनांसोबतच पितांबरीच्या नवीन व जुन्या (सध्या उपलब्ध असलेल्या) उत्पादनांच्या विक्रीतून दुकानाच्या व्यवसायवाढीला वाव आहे. त्याशिवाय या योजनेतील दुकानांमध्ये ग्राहकांना पितांबरीच्या सर्व उत्पादनांवर १०% सवलत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या दुकानांतील ग्राहकांची संख्या वाढू शकते. पितांबरी उत्पादनांच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे आपल्या दुकानातील अन्य कंपन्यांच्या उत्पादनांची विक्रीही वाढणार आहे. अर्थात पितांबरीची उत्पादने आपल्या व्यवसायवाढीसाठी उत्प्रेरकाची म्हणजेच कॅटॅलीस्टची भूमिका पार पडणार आहेत. केवळ दुकानदाराच नव्हे तर कुरियर सर्व्हिस, दूध वितरण किंवा पेपर विक्री केंद्र अशा व्यावसायिकांनाही त्यांच्या अन्य सेवा चालू ठेवत या माध्यमातून ज्यादा उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रसिद्धी करण्यासाठी पितांबरी कंपनी सहकार्य करेलच.
 
यात सहभागी दुकानदारांना त्यांनी या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात ४० ते ४५% मार्जिन कंपनीकडून दिले जाईल. अत्यंत कमी जागेत म्हणजे १०० स्क्वे. फूट जागेतदेखील पितांबरी शॉपी फ्रॅन्चायसी साठी आवश्यक व्यवस्था होऊ शकते. काही नवीन करू इच्छिणाऱ्यांनी आणि एका नामवंत ब्रॅण्डसोबत जोडले जाण्याची संधी घेऊ इच्छिणाऱ्यांनी आजच संपर्क साधा. मंदार फाटक ९००४८३३१६६. [email protected]