आयुष्मान म्हणतोय ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’

15 Nov 2019 16:01:56



आयुष्मान खुराना त्याच्या आगामी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा समलैंगिक संबंधांवर आधारित असून आयुष्मान सह अभिनेता जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट १३ मार्चला प्रदर्शित होणार होता. परंतु आता तो २१ फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याची याची माहिती देण्यात आली. अभिनेता आयुष्मानने सोशल मिडीयावर ‘भागते भागते आ रहे है हम’, असं म्हणत चित्रपटाच पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं.



‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये आयुष्मान खुराना, जितेंद्र कुमार यांच्यासह नीना गुप्ता, गजराज राव, मानवी गाग्रू महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही संपूर्ण कौटुंबिक कथा आहे, असे चित्रपटाचे निर्माते आनंद राय यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0