अजयच्या ‘तान्हाजी’मध्ये हा मराठी अभिनेता साकारणार महाराजांची भूमिका!

    दिनांक  15-Nov-2019 13:18:55
|अजय देवगणचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरीअर’ मधल्या तीन महत्त्वाच्या पात्रांवरून काल पडदा हटवण्यात आला. या चित्रपटात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी ‘सेक्रेड गेम’मध्ये दिसलेला अभिनेता ल्युक केन्नी या चित्रपटात औरंगझेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे, तर अभिनेत्री पद्मावती राव वीरमाता जिजाऊ साकारणार आहेत.

 

 


याआधी अजयने या चित्रपटातील स्वतःचा लुक आणि अभिनेता सैफ अली खानचा खलनायकाच्या भूमिकेतील लुक प्रेक्षकांसोबत शेअर केला होता. चित्रपटातल्या काजोलच्या भूमिकेविषयी अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरीअर’ हा चित्रपट येत्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट थ्रीडीमध्ये असणार आहे.