अभाविपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. एस. सुबैया यांची फेरनिवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : देशातील अग्रणीय विद्यार्थी संघटना म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महामंत्रीपदाच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ. एस. सुबैया यांची पुन्हा निवड झाली असून राष्ट्रीय महामंत्री म्हणून निधी त्रिपाठी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अभाविपच्या मुंबईतील कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

 

अभाविपच्या केंद्रीय कार्यालयातील निवडणूक अधिकारी डॉ. डी. के. शाही यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नियुक्त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असणार आहे. हे दोन्ही पदाधिकारी आगरा (ब्रज) येथे दि. २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ६५व्या राष्ट्रीय अधिवेशनात आपला पदभार स्वीकारणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झालेले डॉ. एस सुबैय्या मुळचे तमिळनाडूतील तुतुकूडी जिल्ह्यातील आहेत. विद्यार्थीदशेपासून कार्यकर्ता म्हणून सक्रीय असणारे सुबैय्या कर्करोग विशेषज्ज्ञ आहेत. एमबीबीएस, शल्यचिकित्सक (कर्करोग चिकित्सा) आदी शिक्षण पूर्ण केल्यावर सध्या ते चेन्नईतील किल्पोक मेडिकल महाविद्यालयात विभागाध्यक्ष आहेत.
 

राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्त झालेल्या निधी त्रिपाठी मुळच्या उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. अलाहाबाद विद्यापीठातून बी.ए. आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एम.ए. आणि एम.फीलपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या आपल्या 'पीएचडी'वर काम करत आहेत. २०१३पासून त्या अभाविप संघटनेत कार्यरत आहेत. २०१७मध्ये जेएनयू येथे झालेल्या निवडणूकांमध्ये त्यांनी अभाविपचे प्रतिनिधीत्व केले होते. सध्या त्या दिल्लीत स्थायिक आहेत.

@@AUTHORINFO_V1@@