धक्कादायक ! गर्भवतीला मुलगी होणार असल्याचे समजताच दिला तलाक

14 Nov 2019 18:17:06


मुझफ्फरनगर : पत्नीला मुलगी होणार असल्याचे समजताच तिहेरी तलाक देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आली. पीडित महिलेचा पती गालीब याला मुलगी असल्याचे समजताच त्याने गर्भपात करण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर तिला तलाक दिला. गालिब याला यापूर्वी दोन मुली आहेत. गालिब याच्याविरोधात सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा निकाह तीन वर्षांपूर्वी झाला आहे. ऑगस्ट २०१९मध्ये तिहेरी तलाक प्रकरणी संसदेत विधेयक संमत झाले होते. 




Powered By Sangraha 9.0