पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

    दिनांक  14-Nov-2019 15:25:50
|
 


नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या पाहाणीसाठी गेले आहेत. नागपूरच्या जामगाव परिसरातून पवारांचा ताफा जात असताना अपघातात दुचाकीचाला त्यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसली. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

 

पवारांच्या ताफा भारसिंगीवरुन खापाकडे निघाला होता. त्यावेळी पुढच्या गाडीची तरुणाच्या दुचाकीला धडक बसली. हा अपघात झाला त्यावेळी शरद पवारांची गाडी पाठीमागून येत होती. ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची कळकळ सांगण्यासाठी शेतकऱ्यांनी वाळलेल्या पिकांचा बुके पवारांना दिला. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी त्यांनी केली. शरद पवार आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यात चारगाव आणि परिसरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासह जाऊन शेतात पाहणी केली. काटोल आणि अर्जूननगर गावातील संत्रांच्या बागेची पाहणी केली.