गौतम नवलखा यांना सुनावणीसाठी नियमित हजर राहावे लागणार

    दिनांक  14-Nov-2019 14:56:46
|मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात नियमित हजर राहण्याचे निर्देश राज्य सरकारतर्फे देण्यात यावेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. सरकारी पक्षाने तसा रितसर अर्ज दाखल करण्यासही न्यायालयाने सांगितले. दरम्यान, आज दुपारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

 

गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी आज सुनावणी सुरू आहे. नवलखा यांची चौकशी गरजेची असल्याचे मत नोंदवत त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

 

गौतम नवलखा यांचे बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (एम) सोबत संबंध असल्याचा आरोप पोलीसांनी केला. यासोबत दहशतवादी कारवाया, देशविरोधी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. २८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी उच्च न्यायालयाच्या ट्रान्झिट रिमांडवर अंतरीम स्थगिती देण्यात आली. नवलखा यांच्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याबद्दल याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली मात्र, १५ नोव्हेंबर रोजी ही याचिकाही फेटाळण्यात आली होती.

 

या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत. त्यांना अटकेपासून काहीकाळ संरक्षण दिले. व योग्य त्या न्यायालयात अटकपूर्व जामिन दाखल करण्याची मुभाही दिली. नवलखा यांनी अटक टाळण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयाचत धाव घेतली. मात्र, ही याचिका फेटाळून लावत विशेष न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पुण्यातील विशेष न्यायालयात पुढील सुनावणी झाली. त्यावेळी अटकपूर्व जामिन फेटाळण्यात आला.