बांग्लादेशी टायगर १५० धावात ढेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |


 


इंदोर : भारत आणि बांगलादेश यांच्यामधील कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर बांग्लादेशच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताचे लक्ष आता कसोटी विजयाकडे आहे. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाहुण्या संघाला अवघ्या ५८.३ षटकांत गुंडाळले.

 

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात अडखळतच झाली. सलामीला आलेल्या जोडीने प्रत्येकी ६ धावा करत भारतीय गोलंदाजासमोर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार मोमीनूल हक आणि मुशफिकूर रहीम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांनाही टिकाव धरता आला नाही. रहिमने सर्वाधिक ४३ धावा केल्या, तर कर्णधार मोमीनूल हकने ३७ धावा केल्या. याव्यतिरिइक्त, इतर कोणत्याही फलंदाजाला कामगिरी करता आली नाही.

 

बांगलादेशला भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ५८.३ षटकांमध्ये १५० धावांमध्ये १० विकेट काढल्या. यामध्ये मोहम्मद शमीने अचूक मारा करत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तसेच, इशांत शर्मा, उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत दोन मालिका खेळल्या आहेत. भारताने वेस्ट इंडिजला २-० ने तर दक्षिण आफ्रिकेला ३-० ने धूळ चारली आहे.

@@AUTHORINFO_V1@@