अमिताभ नव्हे ही अभिनेत्री करणार सूत्रसंचालन !

    दिनांक  14-Nov-2019 18:38:38
|


 

सोनी चॅनेल वरील प्रसिद्ध शो केबीसी हा नेहमी चर्चेत असणारा आणि सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. पण आता केबीसी कार्यक्रमात एक अभिनेत्री सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी या अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. तमिळ अभिनेत्री ‘राधिका सरथकुमार’ या हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.

हे केबीसी हिंदीतलं नसून तमिळ भाषेतलं आहे. केबीसीचं तमिळ व्हर्जन म्हणजेच “कोडीस्वरी” चे सूत्रसंचालन तमिळ अभिनेत्री राधिका सरथ कुमार करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातून टीकेची झोड केबीसीवर पडत होती. त्याचबरोबर अमिताभ बच्चनवर ही भरपूर टीका झाली होती. त्यानंतर सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांनी या सर्व प्रकरणाची जाहीर माफी मागितली होती.


 


नेटिझन्सनी सोशल मीडिया वर नाराजी व्यक्त केली होती
, त्यामुळे अमिताभ बच्चन हे शो सोडतात का अशी चर्चा सुरू झाली. पण केबीसी च्या इतिहासात आणि चित्रपटातील अभिनय कौशल्य दाखवत असे नाविन्यपूर्ण काम आपण सहजतेने पूर्ण कराल. राधिका जी आणि सर्व कोडीस्वरीच्या स्पर्धकांना माझ्या शुभेच्छाअसे म्हणत अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर कलर चॅनेलच्या अकाउंट वरून व्हिडिओ शेअर केला आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.