या अभिनेत्याकडे ‘गुडन्यूज’ !

    दिनांक  14-Nov-2019 13:25:09
|खिलाडी कुमारकडे चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ‘हाऊसफुल ४’च्या यशानंतर अक्षय आता त्याच्या आगामी ‘गुडन्यूज’ या चित्रपटाच्या कामाला लागला आहे. खिलाडी अक्षय कुमारने आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर केले. ‘गुड न्यूज’ या चित्रपटातून अक्षय कुमार आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.या आधी अक्षय आणि करीना ‘कम्बख्त इश्क’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूरसह कियारा अडवाणी आणि दिलजित दोसांजही जोडी दिसणार आहे. येत्या २७ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होत असून, अक्षयचा हा नवीन विनोदी चित्रपट प्रेक्षकांना किती हसायला लावणार हे पाहण औस्तुक्याच ठरणार आहे.