साराला करायचाय ‘गोलमाल’

    दिनांक  13-Nov-2019 12:33:47
| 

 

मनीष पॉलच्या ‘मुव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात अभिनेत्री सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. साराने या आधी रोहित शेट्टीसोबत ‘सिम्बा’ हा चित्रपट केला आहे. ‘सिम्बा’मध्ये सारा अभिनेता रणवीर सिंगसोबत झळकली होती. या कार्यक्रमात साराने रोहितसोबत आणखी चित्रपट करण्याची इच्छाही बोलून दाखवली.
 

या कार्यक्रमात सारा आणि रोहितने काही मजेशीर अॅक्टही सादर केले. या कार्यक्रमादरम्यान साराने रोहितला काही गंमतीदार प्रश्न विचारले. साराने रोहित शेट्टीला, ’गोलमालसाठी अभिनेत्री सापडली का?’ असा प्रश्न केला. त्यावर रोहितने हसत हसत उत्तर दिले, की ‘जेव्हा गोलमाल बनवायला सुरुवात करेन तेव्हा नक्की तुलाच अभिनेत्री म्हणून घेईन.’ यावरून रोहित शेट्टीच्या नव्या चित्रपटात सारा दिसणार हे नक्की! यानिमित्ताने रोहित शेट्टी त्याच्या गाजलेल्या ‘गोलमाल’ सिरीजचा आणखी एक भाग लवकरच घेऊन येण्याचा विचार करत आहे असे वाटते.

 

सारा सध्या इम्तियाज अलीच्या ‘आज कल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, यात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट ‘लव आज कल’ या चित्रपटाचा सिक्वेल असून सैफ अली खानने यात मुख्य भूमिका साकारली होती.