सैफ रंगवणार खलनायक ‘उदयभान’

    दिनांक  13-Nov-2019 14:29:55
|अजय देवगण नंतर आता सैफ अली खानचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातला लुक रिव्हील करण्यात आला आहे. अभिनेता अजय देवगण याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रकाशित केलं आहे. या पोस्टरमध्ये हाती तलवार घेतलेला अभिनेता सैफ अली खान खलनायकाच्या अवतारात दिसत आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात सैफ उदयभान सिंग ही व्यक्तिरेखा साकारतो आहे.

 
 


अजय देवगणने काल ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातला स्वःतचा लुक रिव्हील करणारं पोस्टर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रकाशित केलं.
'तान्हाजी' या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. संपूर्ण मराठमोळा पोशाख फेटा, तलवार या सगळ्या गोष्टींमुळे पोस्टर खूपच आकर्षक दिसत आहे. या पोस्टरला चित्रपट सुष्टील अन्य कलाकारांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला असून अजय देवगणच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाला ३० वर्ष झाल्याच्या निमित्ताने अक्षय कुमारने एक भावूक पोस्ट लिहिली.

१५० करोडचं बजेट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत असून, या चित्रपटातून अजय देवगण आणि सैफ अली खान तब्बल १३ वर्षांनी पुन्हा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. याआधी २००६ मध्ये आलेल्या ‘ओमकारा’ या चित्रपटात ते एकत्र दिसले होते. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात काजोलही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.