माधुरी पुन्हा म्हणणार ‘एक, दो, तीन...’

    दिनांक  13-Nov-2019 19:15:55
|माधुरी दीक्षितने 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्षं पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. यात ती तिच्या लोकप्रिय 'एक दो तीन' या गाण्यावर थिरकताना दिसली.

 माधुरीने तिच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलेय की, 'आज मी 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करतेय. या चित्रपटातील 'एक दो तीन' हे गाणे नेहमीच माझ्यासाठी खास होते आणि यापुढेही असणार आहे. त्यामुळे 'तेजाब' चित्रपटाचा हा प्रवास साजरा करण्यासाठी आम्ही 'एक दो तीन' डान्स चॅलेंज घेऊन आलो आहोत. हे चॅलेंज जिंकणाऱ्यांसाठी माझ्याकडून सरप्राइजही मिळणार आहे.' माधुरीनं या गाण्यावर थिरकताना तसा व्हिडीओ चाहत्यांनासुद्धा शेअर करायला सांगितला आहे. त्यामुळे हे सरप्राइज काय असणार आहे? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


 '
तेजाब' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता अनिल कपूरनेही काही जुने फोटो शेअर करत या सुपरहिट चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'तेजाब' हा असा एक चित्रपट आहे, ज्यानं मला आणि माधुरीला कलाकार म्हणून बरंच काही दिलं. 'तेजाब'चा हा ३१ वर्षांचा हा प्रवास मी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल, दिनेश गांधी आणि एन. चंद्रा या महत्त्वाच्या व्यक्तींना अर्पण करतो.' असं ट्विट त्याने केले.