'तान्हाजी' मधील अजय देवगणचे पोस्टर प्रदर्शित

    दिनांक  12-Nov-2019 12:55:29
|छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठमोळ्या इतिहासाचे दर्शन प्रेक्षकांना ज्या चित्रपटातून घडणार आहे अशा
'तान्हाजी- द अनसंग वोरीअर' या चित्रपटातील आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आज आले आहे. तानाजी म्हटले की डोळ्यासमोर येते ती एक अशी प्रतिमा जिच्या डोळ्यातूनच जरब बसेल. असेच हे नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले असून येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी आनंदाची बातमी प्रेक्षकांना देण्यात आली.

'तान्हाजी' या चित्रपटात सर्वांचा आवडता अभिनेता अजय देवगण या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. आज प्रदर्शित झालेल्या नवीन पोस्टरमधून अजय देवगण अर्थात चित्रपटातील तानाजी मालुसरे यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व झळकत आहे. संपूर्ण मराठमोळा पोशाख फेटा, तलवार या सगळ्या गोष्टींमुळे पोस्टर खूपच आकर्षक दिसत आहे. या पोस्टरला चित्रपट सुष्टील अन्य कलाकारांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला असून अजय देवगणच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाला ३० वर्ष झाल्याच्या निमित्ताने अक्षय कुमारने एक भावूक पोस्ट लिहिली.


ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्या आधी आज प्रदर्शित झालेल्या या पोस्टरने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.