'सुर-ताल कराओके क्लब' प्रस्तुत कराओके ट्रॅक गायन स्पर्धा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |


जेष्ठ संगीतकार पं. अशोक पत्कींच्या हस्ते विजेत्यांचा गौरव !

कधीतरी आपण हातात माईक घेऊन आपल्याला आवडणारे गाणे म्हणावेआपण गात असताना साथीला त्या गाण्याचे संगीत वाजत असावे आणि समोर आपल्याला प्रोत्साहित करणाराकौतुक करणारा प्रेक्षक असावा असे वाटते की नाही ? भले देवाने गाता गळा दिला नसेल पण प्रत्येकाला गावेसे वाटतेच. हीच प्रत्येकाच्या मनातली सुप्त इच्छा ओळखून विले पार्ले पूर्व येथील 'सुर-ताल कराओके क्लब' ने ही अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे.

नवोदित, हौशी गायक गायिकांसाठी ही संस्था वर्षभर विविध उपक्रम आयोजित करीत असते. नोकरी, व्यवसायात अडकल्याने आपली आवड जोपासता येऊ न शकलेल्या पण थोडे फार अंगभूत गायन कौशल्य असलेल्या नवोदित गायक - गायिकांसाठी सुर-ताल कराओके क्लब एक हक्काचं व्यासपीठ आहे. या स्पर्धेतून चांगले गायक गायिका तयार व्हावेत हेच व्यापक उद्दिष्ट ठेऊन हौशी गायक - गायिकांसाठी सुर-ताल कराओके क्लब ची ही स्पर्धा असून जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर, नानू गुर्जर आणि रसिक प्रेक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने आनंद देवधर हे मान्यवर परीक्षकांच्या भूमिकेत असणार आहेत.

या स्पर्धेत नवोदित हौशी गायक - गायिकांना सहभागी होता येईल. स्पर्धकांनी हिंदी चित्रपटातील गाणी गाणे अभिप्रेत आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २५ नोव्हेंबरच्या आत खालील इमेल किंवा व्हाट्सअँप वर नोंदणी करायची आहे.

या स्पर्धेचे प्राथमिक, सेमी फायनल व फायनल असे तीन राऊंड असणार आहेत. प्रथम पुरुष विजेत्यास रोख रु. ५०००/-, प्रथम महिला विजेतीस रोख रु.५०००/-, तसेच दोन्ही रनर अप स्पर्धकांना रु. २५००/- रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. अधिकाधिक गायक, गायिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणी साठी संपर्क : मो. ९७६९३४८४१३ / ९००४५६४९६०. इमेल: [email protected] तसेच ऑनलाइन नोंदणी https://forms.gle/f9NXtna28u6gvvSv5 या लिंकवर करता येईल.

@@AUTHORINFO_V1@@