लवकरच होणार 'क्रिश -४'ची घोषणा !

    दिनांक  12-Nov-2019 16:50:52
| 

 

यंदाच्या वर्षात अभिनेता ह्रतिक रोशनच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सुपर ३० आणि वॉरच्या यशानंतर आता हृतिक पुन्हा एकदा सुपरहिरो क्रिशच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या जानेवारीपासून क्रिश चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याचे कळते आहे.

आगामी नवीन वर्ष हृतिकसाठी खास असणार आहे. क्रिश- सोबतच सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये हृतिकची वर्णी लागली आहे. लवकर राकेश रोशन त्यांच्या आगामी क्रिश- या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. या चित्रपटाच्या कथेवर अद्याप काम सुरू असल्याने चित्रपटाच्या घोषणेत विलंब होत असल्याचेही राकेश रोशन यांनी सांगितले.

'क्रिश चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता करणार असून, राकेश रोशन हे निर्माते म्हणून पुनरागमन करणार आहेत. या चित्रपटात ह्रतिकसोबत क्रिती खरबंदा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळते. हृतिक रोशनच्या क्रिश' सीरिजमधल्या याआधीच्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सुपरहिरो 'क्रि'ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. चित्रपटातील अॅक्शन सीन्सना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. त्यामुळेक्रिश कडून चाहत्यांच्या अपेक्षा नक्कीच उंचावणार आहेत. त्या पूर्ण करण्याचं आव्हान हृतिक रोशनसोबतच दिग्दर्शक आणि लेखकावर असणार आहे. याशिवाय, चित्रपटात हृतिक कोणते नवे अॅक्शन सीन करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.