रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सहभागी कलाकारांसाठी सुवर्ण संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |


रीत क्रिएशन आणि चॅरिटेबल ट्रस्ट गेली सहा वर्ष सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पासून प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे आपल्या "टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन्स" या निर्मिती संस्थेसोबत स्पर्धेचे "टॅलेंट पार्टनर" म्हणून जोडले गेले आहेत.

याविषयी बोलताना मंदार देवस्थळी म्हणाले की, "आज टिव्ही आणि चित्रपटांसाठी उत्तम कलाकार मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. चित्रपटाच्या माध्यमातील लोकप्रियता अल्पावधीत मिळू शकते. यासाठीच स्पर्धेतील निवडक कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन "टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन्स" तर्फे एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून रुपेरी पडद्यावरील विविध तांत्रिक गोष्टींची माहिती या माध्यमातून विनामूल्य दिली जाणार आहे.

स्पर्धेत यश म्हणजे आता फक्त ट्रॉफी आणि सर्टिफिकेट राहणार नसून या यशाला आता भव्य संधीची आणि लोकप्रियतेची जोड मिळणार आहे. म्हणून या स्पर्धेचे स्वरूप स्पर्धा+यश+संधी = रीत असे हे समीकरण आता आता मिळेल.

रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०१९ ची प्राथमिक फेरी २७ ते २९ नोव्हेंबर २०१९ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथील तालीम हॉल येथे पार पडेल. तर अंतिम फेरीत निवड झालेल्यांसाठीची फेरी ५ डिसेंबर २०१९ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पार पडणार आहे.

अधिक माहितीसाठी हे फेसबुक पेज पहा : रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०१९

 
 
@@AUTHORINFO_V1@@