मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक सांताक्रूझमध्ये

12 Nov 2019 18:51:55

 

 
मुंबई : महापालिकेतर्फे सांताक्रूझ पूर्व येथे नेहरू रोडवर मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक होत असून त्याचे भूमिपूजन मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्याच एक्सिलेटर स्कायवॉकचे भूमिपूजन करताना स्थानिक नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी केलेल्या पाठपुराव्याचे महापौरांनी कौतुक केले. या स्कायवॉकमुळे सांताक्रूझमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.
 

आपल्या विभागातील नागरिकांची त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांतून सुटका व्हावी यासाठी पाठपुरावा केल्याचे परब यांनी सांगितले. खासदार विनायक राऊत, आमदार संजय पोतनीस यांनी देखील परब यांच्या कामाचे कौतुक केले. पाचशे मीटर लांबीचा विनाछताचा हा स्कायवॉक असून, त्यास दोन्ही बाजूने दोन दोन असे एकूण ४ सरकते जिने असतील. हा स्कायवॉक १८ महिन्यांत पूर्ण करावयाचा असून त्यांस 20 कोटींहून अधिक खर्च येणार आहे. ...

Powered By Sangraha 9.0