आणखी एका स्टारकीडची एंट्री!

    दिनांक  12-Nov-2019 19:17:24
| 

दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची सात वर्षांची कन्या ‘सितारा’ लवकरच चित्रपटक्षेत्रात पाउल ठेवणार आहे. ती अभिनयातून पदार्पण करणार नसून, ‘फ्रोझन २’ चित्रपटाच्या तेलुगु व्हर्जनच्या ‘एल्सा’ या पात्राला तीने आवाज दिला आहे. २०१३ ला प्रदर्शित झालेल्या ‘फ्रोझन’चा हा दुसरा भाग २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘फ्रोझन २’ हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.
 

या हिवाळ्यात फ्रोझन पाहायला खूप मजा येणार आहे. माझ्या मुलीसाठी मी खूप आनंदी आहे असं म्हणत नम्रताने तिचा आनंद व्यक्त केला आहे. याबाबत सांगताना नम्रता म्हणाली, ‘तिला फ्रोझन हा चित्रपट खूप आवडतो. त्यातील एल्सा हे पात्र तिच्या खूप जवळचे आहे. त्यामुळे एल्साला आवाज देण्याची संधी ती नाकारू शकत नव्हती. ही संधी सिताराला दिल्याबद्दल मी डिस्नीटीमची आभारी आहे.’

 

 

अभिनेत्री श्रुती हसन ही ‘फ्रोझन २’च्या तमिळ व्हर्जनच्या एल्साला आवाज देणार असून, हिंदीमध्ये प्रियांका चोप्राने आवाज दिला आहे.