कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2019
Total Views |


पाकिस्तानी अतिरेकी संघटनांकडून काश्मीरात अशांतता निर्माण करण्याचे काम : जॉर्ज होल्डींग



वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे, असे मत अमेरिकेच्या नॉर्थ केरोलिना खासदार जॉर्ज होल्डींग यांनी गुरुवारी व्यक्त केले. जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी याची गरज होती. दहशतवादी संघटनांना खतपाणी घालून पाकिस्तान नेहमीच जम्मू काश्मीरच्या शांततेत बाधा आणत असल्याचेही ते म्हणाले.





 "भारताने ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरच्या आर्थिक विकासात अडचणी आणणाऱ्या सर्व कायदे रद्द झाले. फुटीरतावादाला थोपवण्यासाठी उचललेल्या पावलामुळे आता येत्या काळात जम्मू काश्मीर पुन्हा विकासाकडे वाटचाल करेल. कलम ३७० मुळे सीमेपलीकडून कुरापती करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना बळ मिळत होते. मात्र, आता या गोष्टींना आळा बसणार आहे.", असे ते म्हणाले.
 

"कलम ३७० हे दोन तृतीयांश इतक्या मताने पारित करण्यात आले. काश्मीरच्या विकासासाठी उचलेले हे पाऊल कौतूकास्पद आहे. घाबरलेली काश्मीरी जनता आता घराबाहेर पडू शकली आहे. या पावलाचे परिणाम दीर्घकालीन असतील. यामुळे दहशतवादालाही लगाम बसेल", असेही ते म्हणाले.




 
 
 
@@AUTHORINFO_V1@@