चेंबूर प्रकरणात विवेक विचार मंच बालहक्क आयोगाकडे

01 Nov 2019 20:05:21


 

अल्पवयीन मुलगी अपहरण प्रकरणात पोलीस प्रशासनाविरोधात तक्रार दाखल


मुंबई : चेंबूर परिसरातील गेले सात महिने एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता आहे. तिच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलीचे वडील पोलिसांकडे पाठपुरावा करत होते. पोलिसांच्या निश्क्रीयतेला कंटाळून मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दम्यान संशयित आरोपीसह पोलिसांचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाले होते. बेपत्ता मुलीच्या वडिलांचे शव स्विकारण्यास कुटुंबीयांनी नकार दर्शवला होता. विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर कुटुंबियांनी शव स्वीकारले. मात्र अंतयात्रेत संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. 








    



 
 


बेपत्ता मुलगी अठरा वर्षाखालील असल्याने ह्या विषयी बालहक्क आयोगाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. विवेक विचार मंचाने संबधित प्रकरणाची दखल घेण्याबाबत विनंती करणारी याचिका बालहक्क आयोगात दाखल केली आहे. 
Powered By Sangraha 9.0