एनसीपीएतर्फे कंटेंपररी डान्स सीजनच्या ९ व्या आवृत्तीचे आयोजन

    दिनांक  01-Nov-2019 10:54:55
|


मुंबई: ५० व्या वर्षी,नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स(एनसीपीए) आपल्या कंटेंपररी डान्स सीजन २०१९च्या ९व्या आवृत्तीचे सादरीकरण करीत आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन ७ आणि ९ नोव्हेंबरला केले जाणार असून, त्यात मयूरी उपाध्या आणि माधुरी उपाध्या, सुमीत नागदेव, पूजा पंत आणि सायरस खंबाटासारख्या प्रसिध्द कलाकारांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे.

कंटेंपररी डान्स सीजन २०१९बद्दल बोलताना, एनसीपीए डान्स हेड सुश्री स्वप्नोकल्पा दासगुप्ता म्हणाल्या,”कंटेंपररी डान्स सीजनमध्ये विविध शैलींचे एकत्रीकरण होत असून, अनेक सादारीकरणांसोबत कंटेंपररी डान्सच्या विचारांना चालना देणा-या संकल्पना प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करतील. या सीजनमध्ये पूजा पंत डान्स अकादमी आणि सुमीत नागदेव डान्स आर्ट्स सारखे स्थानिक प्रतिभावंत त्याचप्रमाणे सायसर खंबाटासारखे आंतरराष्ट्रीय कलावंत आपल्या सहयोग्यांसोबत आपल्या कलेचे प्रदर्शन करतील. मयूरी उपाध्या आणि त्यांची बहिण माधुरी उपाध्या (मुघल-ए-आजम द म्युजिकलच्या नृत्यदिग्दर्शिका) आणि त्यांची नृतारुत्य डान्स कंपनी या वर्षी त्यांची कंटेंपररी कलाकृती सादर करणार असल्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी, टेलिव्हिजन जगतातील प्रसिध्द व्यक्तीमत्व आणि नृत्यांगना मयूरी उपाध्या त्यांच्या स्वत:च्या नृतारुत्य डान्स कंपनी या संस्थेसोबत आपल्या अभूतपूर्व प्रदर्शनाने सीजनचा श्री गणेशा करणार आहेत. त्या ऊर्जा, निसर्ग, पुरुष आणि स्त्रीमधल्या संबंधांपासून प्रेरणा ऊर्जा, निसर्ग, पुरुष आणि स्त्रीमधल्या संबंधांपासून प्रेरणा घेणा-या तुलाकिंवा संतुलनाचे सादरीकरण करणार आहेत. भूतकाळातल्या कथांचे सादरीकरण करण्याची तुला ही अभिनयात्मक यात्रा आहे. व्यक्त होण्याचे माध्यम किंवा भाषा म्हणून नृत्याचा वापर केला जाणार असून, याद्वारे कल्पना, कथाकथन आणि पौराणिक कथांना आदरांजली दिली जाणार आहे. ही निर्मिती नृत्य आणि पुराणांमधला संवाद असून समृध्द आणि स्मृतींनी युक्त असलेली देवाणघेवाण आणि सरल कालाकडले मार्गक्रमण आहे. काही अंशी, आपले अस्तित्व पुराणकथा आणि ज्यांना ऐकत आपण मोठे झालो अशा लोककथांची एका प्रकारे सुंदर गुंफण आहे असे म्हणता येईल. तुलाच्या माध्यमातून आपल्या पाळामुळांमध्ये रुजलेल्या संकल्पना आणि कथा घेतल्या जाऊन त्यांची आजच्या काळाशी सांगड घातली जाणार आहे, यायोगे विविध वयोगटांना संमिलित केले जाणार आहे.

दुस-या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी सीजनमध्ये पूजा पंत डान्स अकादमी, सायरस खंबाटा डान्स कंपनी आणि सुमीत नागदेव डान्स अकादमीचे ३ वेगवेगळे नृत्याविष्कार पहायला मिळणार आहेत.

पूजा पंत डान्स कंपनी स्टोरी ऑफ अ टी-शर्टसादर करणार आहे जो कापड निर्माण उद्योगातल्या घातक रसायनांच्या उपयोगाचा प्रभाव तसेच इतर उद्योगांच्या मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणा-या परिणामावर कथ्थक नृत्यशैलीच्या माध्यमामधून प्रकाशझोत टाकणार आहे. या नंतर सायरस खंबाटा डान्स कंपनी अर्थक्वेक, बिगीन अगेन ऍंड पेंड्युलमसादर करणार आहे.

संध्याकाळची सांगता सुमीत नागदेव डान्स अकादमीच्या दशाननने होणार आहे. दशाननच्या नृत्यदिग्दर्शनामध्ये शक्तीसोबत आत्मसंतुष्टी समवेत चिंता, कुटिलतेसोबतचे ज्ञान व्यक्त केले जाणार आहे. हे सादरीकरण रामायणातील रावण म्हणजेच दशानन या व्यक्तीरेखेवर आधारलेले असून, त्यात यशस्वी अपयशाच्या पार्श्वभूमीवर रावणाचा स्वत:सोबत असलेला विरोधाभास दर्शवणा-या रावणाच्या दहा विविध विचारधारांची वर्तमानकाळामध्ये कल्पना केली जाणार आहे. मूव्हमेंट व्होकॅब्युलरी(हालचालींचा शब्दकोष) भौतिकता आणि भारतीय पारंपारीक नाट्यप्रकार याकशागनाने प्रेरीत आहे ज्यात नृत्य, संगीत, संवाद, पेहराव, रंगभूषा आणि मंचाच्या संदर्भातील तंत्रांचे एकत्रीकरण झालेले आढळून येते.