मंगेश देसाई आणि समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एकत्र झळकणार

    दिनांक  01-Nov-2019 13:15:11
|


अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवुया बँड बाजा' ह्या बहुचर्चित चित्रपटातील आत्तापर्यंत गुलदस्त्यात असलेल्या नावांची घोषणा हळूहळू होत आहे आणि त्यापैकीच एक महत्वाची घोषणा म्हणजे पहिल्यांदाच मंगेश देसाई आणि समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

या चित्रपटात समीर धर्माधिकारी एका लग्नासाठी उत्सुक असलेल्या संदीप या मुलाची भूमिका साकारणार आहे तर प्रसिद्ध कलाकार मंगेश देसाई देखील अशाच अमित नावाच्या एका लग्नोत्सुक मुलाची भूमिका साकारताना दिसेल. हे दोघेही पहिल्यांदाच एका चित्रपटात विनोदी भूमिका साकारताना प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबरच प्रेक्षकांचीही उत्सुकता तितकीच वाढली आहे.

अशा या केतन आणि अमित या दोन भावांची रोमँटिक कथा 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संदीप नाईक यांनी 'वाजवुया बँड बाजा'ची मजेशीर कथा लिहिली आहे तर पटकथा-संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असणार आहे. संगीत-विजय गटलेवार, गायक-आदर्श शिंदे, संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे हे सगळे जण चित्रपटातील प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत.